नविन बातम्या
सस्नेह निमंत्रण
दि. ९ ऑक्टोबर २०१८
पुरुषोत्तम पुरस्कार वितरण

श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहे, शहादा परिसराचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जजयंतीनिमित्त विचारमंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार वितरण.

ऊस संशोधक शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (पुणे) यांच्या व्यक्तीस्तरावर, तर मुंबई येथील मराठी विज्ञान परिषदेचे संस्थास्तरावर रोख एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरुषोत्तम पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे. मध्यप्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार अरुण यादव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील अध्यक्षस्थानी असतील. फाउंडेशनचे सचिव प्राचार्य मकरंद पाटील व मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पाटील यांच्या वतीने कार्यक्रमास उपस्तिथ राहण्याचा आवाहन करण्यात येत आहेत.

कार्यक्रम : मंगळवार, दि. ९ ऑक्टोबर २०१८ रोजी
वेळ : सकाळी ९.३० वाजता
स्थळ : अभियांत्रिकी महाविद्यालयचा प्रांगण
व्हिडिओ
महात्मा गांधी
साने गुरूजी


श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशनची उद्दिष्टे

शिक्षण, सहकार, साहित्य व क्रीड़ा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचा सन्मान करने.

श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशनच्या वतीने रुग्ण सेवा करणे. (यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेली आहे.)

श्री. पी. के. अण्णा पाटिल फाउंडेशन व पूज्य साणे गुरूजी विद्या प्रसारक मंडळ च्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर वकृत्व स्पर्धा आयोजित करणे.

(सदर स्पर्धा २०१५ पासून आयोजित करण्यास सुरवात केलेली आहे.)

©श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार २०१६