आमच्या विषयी

शहादा परिसराचे भाग्यविधाते व शहादा दोंडाईचा मतदार संघाचे माजी आमदार कै. पी. के. अण्णा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने षहादा षहराचा सामाजिक, आर्थिक व षैक्षणिक विकास झालेला आहे. मा. अण्णासाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक प्रकल्प उभेकेले आहे त्यात श्री. सातपूडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना पुरुषोत्तमनगर, लोकनायक जयप्रकाष नारायण षेतकरी सहाकरी सुतगिरणी उंटावद, ता.ष्षहादा हे प्रकल्प उल्लेखनिय आहेत. सन 1969 मध्ये पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करुन परिसरात षिक्षणाचे बीज रोवले. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अभियांयत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, औद्यागिक प्रषिक्षा संस्था, कनिष्ठ व वरीष्ठ षिक्षणषास्त्र महाविद्यालय औषधनिर्माणषास्त्र पदविका, पदवी व पदव्यूत्तर महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय अषा विविध शैक्षणिक संस्था गोमाई व सुसरी नदीच्या किनारी 200 एकर परिसरात उभारुन षिक्षणाची दालने सर्व सामान्य समाजासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे. सहकार, कृषि व षिक्षण या तीन क्षेत्रावर माननिय अणासाहेबांचे सतत चिंतन सरु होते. किसान सुखी तर जग सुखी हा विचार त्यांनंी आपल्या आचरणातून सतत तेवत ठेवला होता. सामान्य माणसाचा सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात तो सुखी व्हावा यासाठी त्यांची सतत धडपड होती.

परिसरातील समाजातील अनिष्ठ रुढी व पंरापरा नष्ट व्हाव्यात यासाठी त्यांनी सामाजिक परिवर्तनाची मषाल सतत तेवत ठेवली त्याचा परिणाम असा झाला की, परिसरातील अनेक रुढी व परंपरांना समाजाने तिलांजली दिली त्यात हुंडाबंदी लग्नातील मानपान यासारख्या रुढींच्या उल्लेख करता येईल मा. अण्णासाहेबांवर पूज्य साने गुरुजी व महात्मा गांधी विचारांचा प्रभाव होता. देेतो तेा देव हा विचार त्यांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा व्यक्त केला होता. त्यामूळे लोक या विचाराकडे आकर्षित होऊन विद्यादानासाठी प्रेरित झालेले आहेत. त्यामूळे शहादे परिसरात षिक्षणाचे भव्य संकुल उभे राहू शकले.

स्वातंत्र्य सेनानी म्हणून मा. अण्णासाहेबंाचे कार्य उल्लेखनिय आहे. मा. अण्णासाहेबांनी तीन वेळा शहादा दोंडाईचा विधान सभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केेेेेेेेेले. या काळात त्यांनी अनेक सहकारी योजना परिसरासाठी राबविल्यात. सहकार व षिक्षणमहर्षि कै. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या कर्तृत्वाने परिसरातील सर्व संस्था आज षिखराप्रत पोहोचल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रातील पष्चिम खान्देषात गांधी विचाराची आच, आस आणि कास असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे संपूर्ण आयुष्य षिक्षण, सहकार व समाज सुधारणासाठी अर्पण करुन हा महामानव दि. 18 सप्टेंबर 2014 रोजी अनंतात विलिन झाला.

कै. मा. अण्णासाहेबांच्या जन्मदिन म्हणजे 9 आॅक्टोबर या दिवषी किसान दिन व विचार मंथन दिन साजरा केला जातो. यादिवषी महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक व संषोधन क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महाराष्ट्रातील व्यक्ती व संस्थेला श्री. पी.के.अण्णा पाटील फौंडेषनच्या वतीने पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप रु. 1,00,00/- मानचिन्ह या स्वरुपाचे असते. आतापर्यंत हा पुरस्कार खालील मान्यवरांना व संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे.

©श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार २०१६