नविन बातम्या
सस्नेह निमंत्रण
दि. ९ ऑक्टोबर २०२०
पुरुषोत्तम पुरस्कार वितरण

श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करीत आहे, शहादा परिसराचे भाग्यविधाते, सहकारमहर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या जजयंतीनिमित्त विचारमंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार वितरण.

यावर्षी संस्थास्थरावर दुष्काळग्रस्त शेतकरी व जनसेवेचे काम करणाऱ्या सिनेअभिनेता श्री. नाना पाटेकर आणि श्री. मकरंद अनासपुरे यांच्या पुणे येथील 'नाम फाऊंडेशन' या संस्थेला तर व्यक्तिगत स्तरावर ज्येष्ठ साहित्यिक तथा 'पानिपतकार' श्री. विश्वास पाटील यांना रोख एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन पुरुषोत्तम पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.

सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. दीपक पाटील अध्यक्षस्थानी असतील. फाउंडेशनचे सचिव प्राचार्य श्री. मकरंद पाटील व मंडळाचे उपाध्यक्ष श्री. किशोर पाटील यांच्या वतीने घोषित करण्यात आले.


व्हिडिओ
महात्मा गांधी
साने गुरूजी


श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशनची उद्दिष्टे

शिक्षण, सहकार, साहित्य व क्रीड़ा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ति व संस्थांचा सन्मान करने.

श्री. पी. के. अण्णा पाटील फॉउंडेशनच्या वतीने रुग्ण सेवा करणे. (यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेली आहे.)

श्री. पी. के. अण्णा पाटिल फाउंडेशन व पूज्य साणे गुरूजी विद्या प्रसारक मंडळ च्या वतीने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरावर वकृत्व स्पर्धा आयोजित करणे.

(सदर स्पर्धा २०१५ पासून आयोजित करण्यास सुरवात केलेली आहे.)

©श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा जि. नंदुरबार २०१६